"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
अभ्यास व लेखन
ललिता घोटीकर
ललिता घोटीकर यांनी आपले B.Sc. आणि M.Sc. शिक्षण मुंबई विद्यापीठातून प्रथम श्रेणीत पूर्ण केले. पदवी परीक्षेत त्या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून B.Ed. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून M.Ed. या पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या. तसेच मुंबई विद्यापीठातून त्यांनी L.L.B. ही पदवीही प्रथम श्रेणीत प्राप्त केली.
१९७५ ते २०२५ या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी अध्यापन क्षेत्रात कार्य केले. 'राम निरंजन झुनझुनवाला कॉलेज' (घाटकोपर) येथे त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापन सुरू केले आणि पुढे त्या उपप्राचार्य पदावरून निवृत्त झाल्या. या काळात त्यांनी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तके लिहिली. याशिवाय, C.E.T. आणि NEET या स्पर्धा परीक्षांसाठीही त्यांनी मार्गदर्शक पुस्तके लिहिली असून त्या विद्यार्थ्यांना यात मार्गदर्शन करत.
निवृत्तीनंतर त्यांनी लेखनाला सुरुवात केली. सध्या त्या एका दैनिकात 'शास्त्रज्ञ' या विषयावर लेखमाला लिहित आहेत. तसेच, त्यांनी दासबोध, भगवद्गीता, वेद आणि उपनिषदे यांचा अभ्यास सुरू केला असून याच विषयावर त्यांनी 'पत्रमालिका' स्वरूपात लेखन समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले आहे.
गिर्यारोहण, पक्षीनिरीक्षण, क्रोशे आणि विविध विषयांचे वाचन हे त्यांचे आवडते छंद आहेत.