"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"विचार नाही, कृती हवी."- शब्द आणि कृती यात अंतर असेल तर समाजाचा विश्वास बसत नाही. म्हणून मी विचार न करता कृतीच्या मार्गावर जाणे निवडले. स्वच्छ मनाने आणि निष्कलंक हेतूने विधायक कार्य सुरू करणे हेच समाधान देणारे आहे.
- नानाजी देशमुख
११ ऑक्टोबर १९१६ शरद पौर्णिमेच्या दिवशी परभणी जिल्ह्यातील कडोळी इथे जन्म
१९२७ चिंचआंबा (तालुका रिसोड) येथे बहिणीच्या घरी स्थलांतर
१९२८ वयाच्या १२ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश
१९३३३४ डॉ. हेडगेवार यांचा सहवास
१९३९ नानाजी वाशीम येथून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण
१९३९ उच्च शिक्षणासाठी व संघाच्या कार्यासाठी पिलानी (राजस्थान) येथे गेले.
१९४० नागपूरला मे महिन्यात चाळीस दिवसांचा संघ शिक्षा वर्ग झाला. त्या वर्गात प्रशिक्षण घेण्यासाठी नानाजी गेले.
१९४० डॉ. हेडगेवार यांच्या चितेसमोर ब्रह्मचर्य पाळून आजन्म संघकार्य करणार अशी प्रतिज्ञा घेतली.
१९४० नानाजी आग्रा येथे पूर्णवेळ संघाचे काम करण्यासाठी गेले.
१९४० बाबासाहेब आपटे यांनी उत्तर प्रदेशात गोरखपूर येथे संघविस्तार करण्यासाठी ‘संघप्रचारक’ म्हणून पाठविले. त्यावेळी पं.दीनदयाळ उपाध्याय यांचा सहवास लाभला. गोरखपूरला संघाची पहिली शाखा.
१९४० संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी झाले.
१९४४ नारायणी नदीला पूर आला तेव्हा नानाजी यांनी पूर पीडितांची मदत केली.
१९४४ तीन वर्षांत संघाच्या २५० शाखा सुरू केल्या. गोरखपूर विभाग प्रचारक म्हणून नेमणूक झाली.
१९४८ रा.स्व.संघावर बंदी. सहा महिने कारावास भोगला.
१९४७ - ५१ राष्ट्रधर्म मासिक, पांचजन्य साप्ताहिक व स्वदेश दैनिक सुरू केले. राष्ट्रधर्म प्रकाशनाचे व्यवस्थापकीय संचालक
१९५० गोरखपूर इथे सरस्वती शिशु मंदिराची स्थापना.
१९५१ जनसंघाची स्थापना,
१९५१ विनोबा भावे यांच्या 'भूदान चळवळीत’ दोन महिने गोळवलकर गुरुजी यांच्या आदेशानुसार सहभागी झाले.
१९५२ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनसंघाच्या प्रचारात महत्वाचे योगदान
१९६७ दिल्ली येथे संयुक्त विधायक दलाचे सरकार स्थापन झाले. यात नानाजी यांचे मोठे योगदान
फेब्रुवारी १९६८ दीनदयाळ उपाध्याय यांचा गूढरित्या मृत्यू.
१९६८ दीनदयाळ शोध संस्थानची स्थापना आणि पं.दीनदयाळ स्मारक समितीची स्थापना
१९७४ बिहार मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली समग्र क्रांती चळवळीत सहभागी
२५ जून १९७५ पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली.
१९७७ जनता पार्टीचे गठन करण्यात मोठा सहभाग
१९७७ बलरामपूर मतदार संघातून प्रचंड मतांनी लोकसभेसाठी निवडून आले. मोरारजी देसाई यांनी मंत्रिमंडळात सामील व्हायला सांगितले. या प्रस्तावाला नकार व राजकारणातून निवृत्ती घेतली.
२५ सप्टेंबर १९७७ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या दिवशी नानाजींनी 'ग्रामीण विकासाची व्यापक योजना' जाहीर केली.
१९७८ गोंडा जिल्ह्यात समाजकार्यास सुरुवात
२५ नोव्हेंबर १९७८ 'जयप्रभाग्राम' उदघाटन
१९७९ जनता पक्षाचे सरकार संपुष्टात
६ एप्रिल १९८० भारतीय जनता पक्षाची स्थापना
१९८४ बीड जिल्ह्यात सामाजिक कार्य करण्यास प्रारंभ
१९९१ चित्रकूट प्रकल्पाची सुरुवात
१९९१ चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय' सुरू केले. त्याचे कुलगुरू नानाजी
१९९५ कुलगुरू पदाचा राजीनामा
१९९५ चित्रकूट प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.
१९९९ राष्ट्रपती द्वारा सन्माननीय राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती
१९९९ पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
१९९९ 'भाऊराव देवरस स्मृती सेवा पुरस्कार’
२००९ मध्यप्रदेश सरकारने नानाजींच्या नावाने 'नानाजी देशमुख विद्यापीठ' काढले.
२०१० चित्रकूट येथे वरिष्ठ नागरिकांचे विश्व संमेलन झाले.
२७ फेब्रुवारी २०१० रोजी सद्गुरू सेवा संघ चित्रकूट येथे नानाजींनी शेवटचा श्वास घेतला.
२०१९ नानाजींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर