"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"शब्द नव्हे, तर कृती हीच प्रेरणा देते." - आज तरुणांच्या मनात आदर्शांबद्दल शंका आहेत. त्या शंकांचे निरसन उपदेशाने नाही, तर कृतीने करावे लागेल. ज्येष्ठांनी स्वतः उदाहरण द्यावे.
- नानाजी देशमुख
नानाजींनी आदिवासी लोकांसाठी बहुमोल असे कार्य केले. समाजातील दीनदुबळ्या, वंचित लोकांसाठी त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी निरनिराळे प्रकल्प राबवले. या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे देश विदेशात अनेक सत्कार झाले. त्यांना निरनिराळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यातील काही उल्लेखनीय पुरस्कार खालील प्रमाणे :
१) १९९५ 'आंतरराष्ट्रीय फेडरेशन फॉर वुमन ॲग्रिकल्चरल अवॉर्ड', 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' व 'रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठान पुरस्कार'
२) १९९७ 'Person of the Year Delhi Rotary International and District, त्याच वर्षी 'राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार' आर. जी. जोशी फाऊंडेशन, मुंबई.
३) १९९९ 'पद्मविभूषण पुरस्कार' भारत सरकारने दिला.
४) १९९९ 'भाऊराव देवरस स्मृती सेवा पुरस्कार ' .
५) २००१ 'National Citizen Award Delhi by Chairman of UNO Human Rights and Commission'
६) २००३ 'जीवन गौरव पुरस्कार' चतुरंग प्रतिष्ठान मुंबई.
७) २००५ 'राष्ट्रीय महात्मा गांधी सन्मान'
८) २००८ 'साहित्य वाचस्पती' ही मानद पदवी
९) २००८ जनकल्याण समिती व्दारा देण्यात येणारा 'प. पू. गोळवळकर गुरुजी पुरस्कार'
१०) याशिवाय खाली दिलेल्या विद्यापीठांकडून 'डी.लिट' ही पदवी नानाजींना बहाल करण्यात आली.
पुणे विद्यापीठ
महर्षी दयानंद सरस्वती विश्वविद्यालय
छत्रपती शहाजी महाराज विद्यापीठ, कानपूर
बुंदेलखंड विद्यापीठ, झांसी
बडोदा विश्वविद्यालय
करवीर विद्यापीठ, कोल्हापूर
२०१९ साली भारत सरकारने 'भारतरत्न' हा पुरस्कार नानाजींना मरणोत्तर बहाल केला.